VIDEO : Ajit Pawar | TET घोटाळ्याचा तपास योग्यरित्या सुरू, अजित पवारांकडून पुणे आयुक्तांची पाठराखण

| Updated on: Dec 25, 2021 | 2:06 PM

तुकाराम सुपेच्या मित्राकडून 5 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. 24 तासात सुपेचे 63 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सुपेचे एकूण ३ कोटी ९३ लाखांचे घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुणे आयुक्तांची पाठराखण केली आणि म्हणाले की, TET घोटाळ्याचा तपास योग्यरित्या सुरू आहे.

पुणे पोलिसांच्या वतीनं तुकाराम सुपेकडून रोकड हस्तगत करण्याचे काम सुरूच आहे. सुपेचे आणखी 5 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. तुकाराम सुपेच्या मित्राकडून 5 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. 24 तासात सुपेचे 63 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सुपेचे एकूण ३ कोटी ९३ लाखांचे घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुणे आयुक्तांची पाठराखण केली आणि म्हणाले की, TET घोटाळ्याचा तपास योग्यरित्या सुरू आहे. जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला 20 ते 21 डिसेंबरला बंगळूरमधून अटक करण्यात आली होती. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केलीय.या प्रकरणाचे धागेदोरे हे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसतंय. 2017 मध्ये आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता