मुंबई CSMT स्थानक परिसरात ठाकरे गट आक्रमक, ‘या’ मागणीसाठी होतंय आंदोलन

| Updated on: Jun 06, 2023 | 11:55 AM

VIDEO | मुंबई CSMT स्थानक परिसरात ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकवटले, प्रशासनावर काय केले आरोप?

मुंबई : मुंबई CSMT स्थानक परिसरात आज ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी त्यांनी आंदोलनही केले. मुंबई CSMT स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर उभारावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे. यामुळे मुंबई CSMT स्थानक परिसरात
ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकवटल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा अशी मागणी वारंवार शिवसेनेकडून करण्यात आली होती. CSMT परिसरात महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रस्ताव मान्य देखील झाला होता, पुतळा बनवून तयार आहे. परंतु प्रशासनाकडून पुतळा उभारण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. या पुतळ्याच लोकार्पण लवकरात लवकर करण्यात यावं यासाठी ठाकरे गट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे जमले आहेत.

Published on: Jun 06, 2023 11:48 AM
‘भावी मुख्यमंत्री नाना पटोले’ बॅनरबाजीवर शिवसेनेच्या नेत्याची टीका; म्हणाला, “ही लोकं सत्तेसाठी…”
पंकजा मुंडे यांना ऑफर देणाऱ्या पक्षांना शिवसेना खासदार भडकला? थेट दिला इशारा; म्हणाला, ‘वावड्या’