मुंब्य्रातील शाखेवरुन ठाकरे-शिंदे गट आमनेसामने, शिंदेंवर काय केला हल्लाबोल?
tv9 Marathi Special Report | मुंब्य्रातील शाखेवरुन ठाकरे-शिंदे गट आमनेसामने आलेत. शिंदे गटानं बुलडोजरने शाखा पाडल्यानंतर ठाकरे मुंब्य्रात, मुंब्य्रातील शाखा परिसराच्या आसपास दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना काय दिलं आव्हान?
मुंबई, १२ नोव्हेंबर २०२३ | मुंब्य्रातील शाखेवरुन ठाकरे-शिंदे गट आमनेसामने आलेत. शिंदे गटानं बुलडोजरने शाखा पाडल्यानंतर ठाकरे मुंब्य्रात आले. मात्र तणावपूर्ण स्थितीमुळे पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट्सपासूनच शाखा पाहून ठाकरे परतले. यादरम्यान, छोटी सभा घेत यावरून ठाकरे गटाने शिंदे यांना आव्हान दिलंय. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची तुफान गर्दी होती. शाखेपासूनच काही अंतरावर पोलिसांनी उद्धव ठाकरे यांची गाडी अडवली आणि पुढे जाता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. असे असताना उद्धव ठाकरे शाखेकडे जाण्यावर ठाम होते. त्यांनी या शाखेवरून आरपारच्या लढाईची घोषणा केली. माझे पदाधिकारी त्याच शाखेसमोर येऊन बसणार आणि मी तिथेच पुन्हा शाखा बांधणार, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे पाहायला मिळाले. बघा नेमकी काय काय आव्हान शिंदे यांना दिलीत?
Published on: Nov 12, 2023 08:00 AM