शरद पवार आणि उद्धव ठाकरे भेटीमागचं कारण काय? राजकीय वर्तुळात चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत जाणार आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेही शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर जाणार आहेत. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे लक्ष
मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत जाणार आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेही शरद पवार यांच्या भेटीसाठी शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी साडेचार वाजता शरद पवार यांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते. याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागले आहे. तर यांच्यात होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीवर आगामी राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळातही या भेटीचं कारण काय असेल याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप कसं करावं, कुणाला किती जागा द्यायच्या, याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.