Special Report | तर ठाकरे गट, काँग्रेस आणि वंचित नवी आघाडी? उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
VIDEO | काँग्रेसचे वेणूगोपाल मातोश्रीवर तर उद्धव ठाकरे दिल्लीत जाणार? राज्याच्या राजकारणात घडतंय तरी काय, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले यादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी देखील अजित पवारांच्या चर्चांवर भाष्य केलं. मला एकट्यालाच भाजपविरोधात लढावं लागेल, असं उद्धव ठाकरे काँग्रेस नेत्यांना बोलल्याचं समजतंय. मात्र जर वेळ आलीच तर, ठाकरे गट-काँग्रेस आणि वंचित एकत्र लढू शकतात. भाजपसोबत जाण्यासंदर्भात कोणताही प्लॅन नाही? निव्वळ अफवा आहेत हे अजित पवारांनी स्पष्ट केलं. मात्र या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य फार महत्वाचं आहे. मला एकट्यालाच भाजपसोबत लढावं लागेल, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांकडे केल्याची माहिती आहे..ज्याचा उल्लेख अजित पवारांनीही आपल्या पत्रकार परिषदेत केला पण राष्ट्रवादीत काही घडलंच तर, ठाकरे गट, काँग्रेस आणि वंचित एकत्र येऊन लढू शकतात. बघा स्पेशल रिपोर्ट