शिवरायांची वाघनखांवरून आदित्य ठाकरे यांचा सरकारला सवाल; म्हणाले, ‘सरकारने स्पष्टता…’
VIDEO | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाखनखांबाबत राज्य सरकारकडे मागितली स्पष्टता, म्हणाले, 'राज्यात आणण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांबाबत राज्य सरकारने स्पष्टता करावी, भावनांचा खेळ कुठही नको, म्हणून स्पष्टता हवी आहे', अशी मागणी त्यांनी केली.
मुंबई, ३० सप्टेंबर २०२३ | अफजलखानाला संपवण्यासाठी जी वाघनखं छत्रपती शिवरायांनी वापरलेली वाघनखं लवकरच भारतात परत आणण्यात येणार आहे. येत्या १६ नोव्हेंबरला शिवरायांची वाघनखं मुंबईत आणण्यात येणार असून ती तीन वर्षांसाठी भारतात असणार आहे. दरम्यान, यावरून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला थेट सवाल करत स्पष्टीकरण मागितले आहे. ते म्हणाले, राज्यात आणण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांबाबत राज्य सरकारने स्पष्टता करावी, या संदर्भातील माहिती राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी वाघनखांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे. आदित्य ठाकरे पुढे असेही म्हणाले की, ‘व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयाच्या वेबसाइटवर सांगितलय की जेम्स ग्रॅण्ड डफ यांचा दावा आहे की, ती वाघनखं महाराजांनीच वापरली. पण व्हिक्टोरिया अलबर्ट म्युझिमच्या वेबसाइटवर म्हटलय की, महाराजांनीच ही वाघनखं वापरली हे सांगू शकत नाही. भावनांचा खेळ कुठही नको, स्पष्टीकरण हवं आहे.’