महाराष्ट्रातील भाजपचं नेतृत्व अकार्यक्षम अन् कुचकामी; म्हणून मोदींचा महाराष्ट्र दौरा; कुणाची सडकून टीका?
VIDEO | मुंबई महानगपालिकेवरून ठाकरे गटाचा भाजपविरोधात हल्लाबोल, 'निवडणुकीला आम्ही घाबरत नाही तर ...'
छत्रपती संभाजीनगर : मुंबई महानगरपालिका, बाजार समिती, पोटनिवडणुकांतून ठाकरे गट आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आज भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यांना ५० जागांच्यावर जाऊ देणार नाही, असे म्हणत टीकास्त्र सोडले होते. यावर ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्या अशी मागणी करत अंबादास दानवे यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला आहे. या निवडणुका भारतीय जनता पार्टी काही तांत्रिक कारणामुळे या निवडणुका पुढे ढकलते आहे असा आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे. निवडणुकीला आम्ही घाबरत नाही तर निवडणुकीला भारतीय जनता पार्टी घाबरते आहे असा टोलाही त्यांनी आशिष शेलार यांना लगावला आहे. यावेळी अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पार्टीला थेट आव्हान देत घोडा मैदान जवळ आहे किती निवडून येणार हे मुंबईची जनता निश्चित दाखवून देईल असा इशाराही दिला आहे. महाराष्ट्रातील नेतृत्व अकार्यक्षम, कुचकामी यांच्यामध्ये दम नाही, ताकद नाही अशा टीका केल्या जात असल्या तरी भाजपला केंद्राच्या नेतृत्वाला साध्या निवडणुकांसाठी या ठिकाणी यावे लागते, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.