गद्दार माणूस काय करारा जवाब देणार, खेडच्या सभेपूर्वी कुणी एकनाथ शिंदे यांना डिवचलं?

| Updated on: Mar 19, 2023 | 3:32 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेडच्या सभेवर बोचरी टीका करत ठाकरे गटाच्या नेत्यानं केला हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रत्नागिरी येथील खेडच्या गोळीबार मैदानावर जाहीर सभा होणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच यांच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आता त्याच टीकेला एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, करारा जवाब मिलेगा या आशयाची बॅनरबाजी देखील सभेच्या ठिकाणी लावून शिवसेनेकडून सभेची चांगलीच वातावरण निर्मिती केल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची तोफ डागल्याचे समोर आले आहे. ते म्हणाले, काय करारा जवाब देणार, त्यांच्याकडे तोंड दाखवायला जागा नाही. नुसत्या घोषणा आहे. त्यांच्यात करारीपणा नाही, करारा जवाब देण्याची हिंमतही नाही. यांच्यात फक्त गद्दारी आहे. गद्दार माणूस काय करारा जवाब देणार, असे म्हणत अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Published on: Mar 19, 2023 03:09 PM
‘विरोधकांच्या पोटात आग, मैदानात उतरला ढाण्या वाघ’, मुख्यमंत्र्यांची सभा रेकॉर्डब्रेक होणार, शिवसेना नेत्यांचा विश्वास
ड्रोनच्या नजरेतून बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेड सभेची जंगी तयारी