‘राणे पिता-पुत्र हे मडक्या अन् गाडग्यासारखे…’, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची जिव्हारी लागणारी टीका

| Updated on: Nov 14, 2024 | 3:52 PM

आव्हान हे मर्दांनी द्यायचं असतं. हे कोण आव्हान देणारे? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी सभेतून नारायण राणे यांच्यासह त्यांची मुलं निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. यावर ठाकरे गटाच्या नेत्यानं काय म्हटलं?

उद्धव ठाकरे यांची एक सभा झाली. यासभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, आव्हान हे मर्दांनी द्यायचं असतं. हे कोण आव्हान देणारे? असा सवाल करत नारायण राणे यांच्यासह त्यांची मुलं निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल केलाय. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सभेतून नारायण राणे यांच्यासह त्यांची मुलं निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावरही निशाणा साधला. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केले आहे. ‘नारायण राणे आणि त्यांची मुलं हे गाडग्यासारखी आहेत. कोणत्या पक्षात आहेत हेच माहिती नाही यांना..’, असं म्हणत अंबादास दानवे यांनी जिव्हारी लागणारी टीका केली. पुढे ते असेही म्हणाले की, ‘कधी ते शिवसेनेत होते मग काँग्रेसमध्ये गेलेत. मग स्वतःचा पक्ष काढला नंतर भाजपमध्ये गेलेत. बाप भाजपमध्ये तर पोरगा शिवसेनेमध्ये… हे का आव्हान देणार ते मडक्यासारखे गाडग्यासारखे…’, असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला समर्थन देत अंबादास दानवे यांनी राणे पिता-पुत्रांवर जहरी टीका केली.

Published on: Nov 14, 2024 03:52 PM
Vinod Tawade : विधानसभेला भाजपच्या किती जागा येणार?, कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं…
‘रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर दंश मारणार’, ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल