Eknath Shinde यांचा परदेश दौरा पुढे ढकलल्यानंतर ठाकरे गटातील नेता म्हणतो, ‘ये डर अच्छा है…’
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत १ ऑक्टोबरपासून परदेश दौऱ्यावर जाणार होते. इंग्लंडसह जर्मनी असा १० दिवसांचा परदेश दौरा रद्द, एकनाथ शिंदे यांचा परदेश दौरा पुढे ढकलल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा खोचक टोला
मुंबई, २६ सप्टेंबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १ ऑक्टोबरपासून परदेश दौऱ्यावर जाणार होते. मात्र इंग्लंडसह जर्मनी असा १० दिवसांचा परदेश दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परदेश दौऱ्यावरून प्रश्न उपस्थित केले होते. त्याची सरकारला भिती असल्याचे म्हणत त्यामुळेच हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे तर पुढे अंबादास दानवे असेही म्हणाले की, ‘आदित्य ठाकरे यांनी या परदेश दौऱ्याविषयी प्रश्न उपस्थित केले होते. हा दौरा कसा होता, का होतो… या दौऱ्याचा खर्च कोणाकडून केला जातो? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. आदित्य ठाकरे यांनी हे प्रश्न उपस्थित केले नसते तर हा दौरा झाला असता, हिंदी चित्रपटात म्हणतात ना ये डर अच्छा है, तशीच परिस्थिती आहे.’ असे म्हणत अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परदेश दौऱ्यावरून हल्लाबोल केला आहे.