लोकसभेत भाजपने 100 जागा ओरबडल्यात, राऊतांचा गंभीर आरोप; आयोगाच्या कारभारावरही ठेवलं बोट

| Updated on: Jun 24, 2024 | 11:25 AM

लोकसभा निवडणुकीत भाजपने १०० हून अधिक जागा दबावाने ओरबडल्यात, असं संजय राऊत म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मुंबईसह देशात किमान ६० ते ७० ठिकाणी तांत्रिक घोटाळे करून भाजपने विजय मिळवल्याचा आरोप संजय राऊत यांनी सामनातून केला. बघा नेमके काय केले आरोप?

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपसह केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने १०० हून अधिक जागा दबावाने ओरबडल्यात, असं संजय राऊत म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मुंबईसह देशात किमान ६० ते ७० ठिकाणी तांत्रिक घोटाळे करून भाजपने विजय मिळवल्याचा आरोप संजय राऊत यांनी सामनातून केला. तसेच निवडणूक आयोगाच्या कारभारावर संजय राऊत यांनी बोट ठेवलंय. ‘२०२४ च्या निवडणुकीत भारताच्या निवडणूक आयोगाचे वर्तन सरळ पक्षपाती होते. भाजपची घोडदौड ११० ते १२० वरच थांबणार होती. निवडणूक आयोगाच्या पक्षपातामुळे २४० चा आकडा गाठता आला. धनुष्यबाण, घड्याळ ही चिन्हे गोठवायलाच हवी होती. पण फुटिरांना ही चिन्हे देण्याचं काम निवडणूक आयोगाने केले आहे. मशाल, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला ही आव्हान उभे करण्याचा प्रयत्न झाला, असे आरोप हल्लाबोल करत कुंपनाने शेत खाल्ले असेच घडले’, असा आरोप सामनाच्या रोखठोकमधून निवडणूक आयोगावर करण्यात आला आहे.

Published on: Jun 24, 2024 11:25 AM