जनतेची सरकारच्या कंबरड्यात लाथ, संजय राऊत यांची शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका

| Updated on: Apr 30, 2023 | 12:22 PM

VIDEO | कृषी बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालावर संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले? थेट म्हणाले...

मुंबई : राज्यातील बाजार समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यात आणि या निवडणुकीचा निकालही समोर आला आहे. या निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा मिळवल्याचे समोर आले आहे. यावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांचं प्रतिनिधीत्व करणारी संस्था आणि संघटना आहे. यंदा शिवसेना महाविकास आघाडीसह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उतरली. बाजार समितीच्या निवडणुकीत आघाडीला निर्विवाद यश मिळालं आहे. यावरून असे लक्षात येते की शेतकरी या सरकारला वैतागला आहे. या निकालाने सरकारच्या कंबरड्यात पहिली लाथ मारली आहे. मिंधे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात शिवसेना जिंकली आहे. पारोळा, मालेगाव आणि बुलढाणा या मिंधे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात आम्ही जिंकलो आहोत. ही लोकांची मन की बात आहे. ज्या भागात शिवसेनेशी गद्दारी झाली. तिथे शिवसेना आणि महाविकास आघाडीचं पॅनल विजयी झाले. ज्यांनी शिवसेनेवर घाणेरडे आरोप केले तिथे त्यांचा पराभव केला तर मतदारांनी शिंदे गटाच्या आमदारांना नाकारलं असल्याचं यातून स्पष्ट होत असल्याचे असं संजय राऊत म्हणाले.

Published on: Apr 30, 2023 12:22 PM
तुमच्या दोन्ही मुलांना एकत्र ठेवायचं असेल तर संजय राऊतला लांब ठेवा; नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
उद्धवला आण, बघतो तो कसा येतो ते; एकेरी उल्लेख करत नारायण राणे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल