कोकण कुणाच्या मालकीचं नाही, नाव न घेता संजय राऊत यांनी कुणाला फटकारलं?

| Updated on: Apr 30, 2023 | 11:51 AM

VIDEO | ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचा बारसूतील आंदोलनावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल, बघा काय म्हणाले?

मुंबई : उद्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा मुंबईतील बीकेसी येथे होणार आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनमानसाचा निकाल कोणाच्या बाजूने आहे हे उद्या महाराष्ट्राची राजधानी ठरवेल, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी रत्नागिरीती बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत देखील भाष्य केलं. बारसूत अजूनही अत्याचार सुरू आहे. अजूनही पोलीस कारवाया सुरू आहेत. महिला आणि शेतकऱ्यांवर जोर जबरदस्ती केली जात आहे. उद्धव ठाकरे यांना कोकणात पाय ठेवू देणार नाही ही धमकी आहे. अशा धमक्यांना शिवसेना भीक घालत नाही. हिंमत असेल तर अडवून दाखवा. आम्ही येतोय. अडवून दाखवा, असं आव्हानच राऊतांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नाव न घेता दिलं आहे. तर कोकण कुणाच्या मालकीचं नाही असे म्हणत त्यांनी राणे कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

Published on: Apr 30, 2023 11:51 AM
कोल्हापूर बाजार समितीत मविआनं खातं उघडलं, 4 जाणांचा विजय; पहा कोणत्या गटातून झाले विजयी
“उद्धव ठाकरे आजारी होते, तेव्हा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, ते रश्मी ठाकरेंवर दबाव आणत होते”