Saamana Sanjay Raut : सिस्टम में भ्रष्टाचार नहीं, बल्कि… संजय राऊत यांनी जेलमध्ये काय भोगलं? केला मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Nov 07, 2023 | 1:56 PM

सामनाच्या दिवाळी अंकातील लेखात संजय राऊत यांनी तुरुंगातील अनुभव मांडला आहे. सामनाच्या दिवाळी अंकात कसाबच्या यार्डात हा संजय राऊत यांचा लेख प्रसिध्द झाला. जेलमध्ये एकंदरीत व्यवस्थेत भ्रष्टाचार नाही, तर जेलमध्ये भ्रष्टाचार हीच एकमेव व्यवस्था आहे, असे राऊत म्हणाले

मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३ | ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक मोठा आणि खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. सिस्टम में भ्रष्टाचार नही, बल्की जेल में भ्रष्टाचार ही सिस्टम है, असे म्हणत सामनाच्या दिवाळी अंकातील लेखात संजय राऊत यांनी स्वतःला आलेले तुरुंगातील अनुभव मांडले आहेत. कसाबच्या यार्डात हा लेख संजय राऊत यांचा त्या दिवाळी अंकात प्रसिध्द झालाय. कोर्टाने एखाद्या कैद्याबाबत दिलेल्या आदेशाचे पालन तुरुंग प्रशासनाकडून होत नाही. मग ते आदेश वैद्यकीय सुविधांबाबत असो नाही तर जेवणाबाबत. जेलचे कारभारी त्यांच्या मर्जीनेच ठरवतात. तुम्हाला त्यांच्या व्यवस्थेपुढे शरण जावे लागते. संपूर्ण व्यवस्था देशभरातच भ्रष्ट आहे. पण इकडे ‘सिस्टम में भ्रष्टाचार नही, बल्की जेल में भ्रष्टाचार ही सिस्टम है.’

राऊत म्हणाले, कैद्यांना रक्ताच्या नातेवाईकांना भेटण्याची मुभा असते. त्या हक्काच्या मुलाखतीपासून खाणे-पिणे, कपडे, फोनवर नातेवाईकांशी संवाद साधणे या सगळ्यात भ्रष्टाचार होत असतो. कसाब, अबू जिंदाल, अबू सालेम हे आर्थर रोड तुरुंगात होते व त्यांच्या जेवणा-खाण्याची व्यवस्था उत्तम होत असे. ते अतिरेकी असले तरी मानव अधिकाराचे सर्व लाभ त्यांना मिळत. जे इतर सामान्य कैद्यांना कधीच मिळत नाहीत. अनेक उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, कच्चे कैदी जेलमध्ये नरकयातना भोगत आहेत, असे राऊत म्हणाले.

Published on: Nov 07, 2023 01:47 PM
Mumbai Air Pollution : मुंबईतील ‘हे’ शहर सर्वाधिक प्रदूषित, काय आहे हवेची गुणवत्ता ढासळण्याचं कारण?
Shahaji Bapu Patil : …तर शिवसैनिकांची अवलाद सांगणार नाही, शहाजीबापूंना कुणी दिलं ओपन चॅलेंज