अनिल परबांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचे 12 ते 13 घोटाळे मी….

| Updated on: Apr 02, 2024 | 3:50 PM

अनिल परब यांनी आमदार रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केलेत. रामदास कदम यांच्याकडून जमीन घोटाळा झाल्याचा आरोप करत रामदास कदम यांचे 12 ते 13 घोटाळे मी बाहेर काढणार आहे, असा इशाराही अनिल परब यांनी दिला. रामदास कदम यांच्या घोटाळ्याचे पुरावे किरीट सोमय्यांना देणार, हिंमत असेल तर त्यांनी....

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते, आमदार रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. रामदास कदम यांच्याकडून जमीन घोटाळा झाल्याचा आरोप करत रामदास कदम यांचे 12 ते 13 घोटाळे मी बाहेर काढणार आहे, असा इशाराही अनिल परब यांनी दिला. रामदास कदम यांच्या घोटाळ्याचे पुरावे किरीट सोमय्यांना देणार, हिंमत असेल तर त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करावा आणि रामदास कदमांसह त्यांच्या दोन्ही मुलांना तुरूंगात टाकावं आणि ईडी चौकशी करण्याची मागणीही सोमय्यांनी करावी, असे अनिल परब म्हणाले. पुढे परब असेही म्हणाले, कदम यांनी स्वत:च्या भावाला देखील सोडलेलं नाही, आमची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तर स्वत: काचेच्या घरात रहायचं आणि दुसऱ्यांच्या घरावरती दगड मारायचं काम रामदास कदम यांनी केलंय. त्याचबरोबर मुंबईतील एसआरए घोटाळे, मुंबईतील भानगडी, प्रदूषण मंडाळाचा अध्यक्ष असताना केलेले घोटाळे याचा पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे परब यांनी म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केलाय.

Published on: Apr 02, 2024 03:50 PM
आपच्या 4 नेत्यांना अटक करण्याचं भाजपचं षडयंत्र, कुणी केला खळबळजनक दावा?
उंदीर चावला अन् रूग्ण दगावला… ससूनमध्ये एकच गदारोळ, नातेवाईकांचा आरोप काय?