सध्या पाटलांचीच चलती, गौतमी ते जरांगे व्हाया ललित पाटील अशी परिस्थिती; या नेत्यानं लगावला टोला

| Updated on: Dec 21, 2023 | 1:59 PM

राज्य विधीमंडळाचं अधिवेशन नुकतंच नागपूर येथे पार पडलं. या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चाही झाली आहे. महाराष्ट्रात सध्या पाटलांचीच चर्चा आहे.

नागपूर, २१ डिसेंबर २०२३ : राज्य विधीमंडळाचं अधिवेशन नुकतंच नागपूर येथे पार पडलं. या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चाही झाली आहे. महाराष्ट्रात सध्या पाटलांचीच चर्चा आहे. गौतमी पाटील ते मनोज जरांगे पाटील व्हाया ललित पाटील अशी परिस्थिती आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केले आहे. तर दिवाळी पहाटच्या वेळी देखील गौतमी पाटीलचा कार्यक्रम होतोय असा टोलाही अनिल परब यांनी लगावला आहे. दिवाळी पहाटच्या वेळी गौतमी पाटीलचा डान्स ठेवतात. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमात गर्दी आणि मारामारी हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे का? असा सवालही अनिल परब यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपस्थित केलाय. विधानपरिषदेत बोलत असताना अनिल परब यांनी हे वक्तव्य केले आहे.

Published on: Dec 21, 2023 01:59 PM
मुख्यमंत्री शिंदे यांच्या टार्गेटवर ठाकरे पिता-पुत्र ; म्हणाले, चाहिए खर्चा… निकालो मोर्चा
महाराष्ट्राची चिंता वाढली! ‘या’ जिल्ह्यात सापडला कोरोनाच्या नव्या JN1 व्हेरियंटचा रूग्ण