‘रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर दंश मारणार’, ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल

| Updated on: Nov 14, 2024 | 4:37 PM

रामदास कदम सरपटणारा साप आहे, अशी जिव्हारी लागणारी टीका ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली आहे. रामदास कदम यांना भाजपवाल्यांनी दुखावलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर रामदास कदम दंश मारणार असल्याचे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं आहे.

रामदास कदम सरपटणारा साप आहे, अशी जिव्हारी लागणारी टीका ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली आहे. रामदास कदम यांना भाजपवाल्यांनी दुखावलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर रामदास कदम दंश मारणार असल्याचे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं आहे. तर भास्कर जाधव यांच्याकडून मंत्री दीपक केसरकर यांचा चंगू असा उल्लेख करण्यात आला आहे. ‘मला भाजपला सांगायचं आहे की, रामदास कदम हा ढूक धरणारा सरपटणारा साप आहे. भाजपवाल्याने त्याला पुरेपर दुखावलंय, पण तूर्तास विधानसभेची निवडणूक आहे, म्हणून तो गप्प आहे. मान खाली घालून आहे पण निवडणूक झाल्यानंतर तो डंख मारल्याशिवाय राहणार नाही’, असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी भाजप आणि रामदास कदम यांच्यावर केला. तर पुढे असेही म्हणाले, ‘ही निवडणूक गद्दार विरूद्ध खुद्दार आहे. तशीच ती धनशक्ती विरूद्ध जनशक्तीची निवडणूक आहे. हे विसरू नका.. धनशक्ती ही पन्नास खोक्यांच्या माध्यमातून ज्यांच्याकडे गेली आहे ते सावंतवाडीचे दीपक केसरकर यांच्याविरोधात सामान्य शिवसेनेचा राजन तेली निवडणूक लढतोय. एका चंगू समोर माझा सहकारी वैभव नाईक निवडणूक लढतोय. दुसऱ्या मंगू समोर आमचा संदेश पारकर निवडणूक लढतोय.’

Published on: Nov 14, 2024 04:37 PM
‘राणे पिता-पुत्र हे मडक्या अन् गाडग्यासारखे…’, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
Priya Sarvankar : ‘त्यापेक्षा एखाद्या चित्रपटात काम केलं असतं तर चांगलं यश…’, सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला