‘राणेच म्हणाले होते… भाजप हा गुंडाचा, भ्रष्टाचारांचा अन् दरोडेखोरांचा पक्ष’; ठाकरे गटाच्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल

| Updated on: Sep 02, 2024 | 4:51 PM

सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सिंधुदुर्गातील मालवण येथे असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप आजही सुरू आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर घणाघात केलाय. राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी भाजप आणि ठाकरे गट आपापसात भिडल्याचा राडा पाहिला. हा राडा भाजपच्या संस्कृतीशी सुसंगत असा होता. हा राडा भाजपचा नित्यनियमीत असलेला कार्यक्रम आणि कार्यपद्धत होती, याचं कारण म्हणजे या राड्याच्यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे येथे उपस्थित होते, असे भास्कर जाधव म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, नारायण राणेंनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत भाषण करताना सांगितलं होतं. ते रेकॉर्ड आजही विधान परिषदेत आहे. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा नारायण राणे म्हणाले होते की, भारतीय जनता पार्टी हा गुंडाचा पक्ष आहे. भाजप हा भ्रष्टाचारांचा पक्ष आहे. इतकंच नाहीतर भाजप हा पक्ष दरोडेखोरांचा पक्ष आहे. भाजप हा पक्ष दारू, मटकेवाले जेवढे वाईट काम करणारे लोकं आहेत. तेवढे भाजपचे लोक आहेत, असं वक्तव्य करत भास्कर जाधव यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Published on: Sep 02, 2024 04:24 PM
Verul Caves Waterfall : प्रतीक्षेनंतर ओसंडून वाहू लागला वेरूळ लेणीचा सीता न्हाणी धबधबा, बघा रौद्ररूप
आता मुलगाही म्हणतोय घुसून मारू, नारायण राणेंनंतर आता नितेश राणेंची कोणाला धमकी? म्हणाले, चून-चून के मारेंगे