‘मालवणातील शिवरायांचा पुतळा रात्री पडला असता तर…’, ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण भागात असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याची घटना गेल्या काहीदिवसांपूर्वी घडली. मात्र य़ा घटनेवर राजकारण केलं जात असल्याची टीका विरोधकांकडून होतेय. तर सत्ताधारी नेत्यांकडून यावर माफी देखील मागण्यात आली आहे
‘मालवणमधील शिवरायांचा पुतळा दिवसा पडला म्हणून काहीतरी अनिष्ठ टळलं’, असं ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी म्हटले तर हाच शिवरायांचा पुतळा रात्री पडला असता तर ते इतर धर्मियांवर टाकलं असतं, असे म्हणत भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ‘मालवणचा पुतळा दिवसा पडलं म्हणून बरं..काहीतरी मोठं अनिष्ट टळलं. शिवरायांचा पुतळा कोसळला यात दु:ख आहे. शिवरायाचा पुतळा तयार करण्यासाठी घेण्यात आलेलं काम हे भ्रष्टाचाराचं काम आहे.’, असे म्हणत भास्कर जाधव यांनी सरकारवरच हल्लाबोल केला तर पुढे ते असेही म्हणाले की, जर हाच शिवरायांचा पुतळा रात्री पडला असता तर ते इतर धर्मियांवर टाकलं असतं, आता सुद्धा रत्नागिरीत कोणीतरी हिंदू माणूस सापडला. पण त्या सापडलेल्या हिंदू माणसावर भाजपकडून शंका घेण्यात आली असून तो माणूस हिंदू नसून इतर धर्मातील असल्याचे म्हटले जात आहे.