11 महिन्यांच्या छळवादाला कोर्टाच्या निर्णयानं चपराक, भास्कर जाधव असं का म्हणाले?

| Updated on: May 13, 2023 | 3:37 PM

VIDEO | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण, काय म्हणाले भास्कर जाधव?

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर जो निर्णय दिला. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या ११ महिने ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आणि त्यांच्या शिवसेनेचा छळवाद सुरू होता. त्यांना चपराक देण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. या भेटीनंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयातील बारकावे हे आपल्या बाजूचे कसे आहेत. यासंदर्भातील माहिती उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं आणि मनोधैर्य खचलेले नाही, भविष्यातही खचणार नाही, नवीन उत्साह ताकदीने महाराष्ट्रात जाऊया, अशा प्रकारचा आशावाद उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

Published on: May 13, 2023 03:37 PM
Karnataka Election : काँग्रेसच्या दणदणीत विजयावर राहुल गांधी म्हणाले, भांडवलशाहीचा…; मोदी यांच्यावरही साधला निशाना
Karnataka Election Results 2023 : कर्नाटक निकालानंतर शरद पवार यांचं पहिलं भाष्य, म्हणाले…