पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे पडणार, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा दावा अन् भाजपचं वाढलं टेन्शन
लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. अखेरच्या ७ व्या आणि शेवटच्या टप्प्यात ५७ जागांवर मतदान होणार आहे. तर या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा देखील थंडावल्या आहेत. तर या लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार आहे.
देशात लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. अखेरच्या ७ व्या आणि शेवटच्या टप्प्यात ५७ जागांवर मतदान होणार आहे. तर या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा देखील थंडावल्या आहेत. तर या लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार आहे. त्यामुळे राज्यात, देशात कुणाची हवा राहणार… महाविकास आघाडी की महायुती? याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केला आहे. चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या दाव्यामुळे एकच चर्चांना उधाण आलं आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे पडणार असल्याचा दावा त्यांनी केला तर महाविकास आघाडीला राज्यात 32 जागा मिळतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपले आहेत. मराठवाड्यात महायुतीला एकही जागा मिळणार नाही. असेही खैरेंनी म्हटले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे पाच दिवस बाकी असताना खैरे यांच्या मोठ्या दाव्याने मात्र भाजपचं टेन्शन मात्र चांगलंच वाढवलं आहे.