Raj Thackeray यांनी मुख्यमंत्र्यांना का भेटावं? सरळ धमकी देवून टाकावी, कुणी केलं मोठं वक्तव्य?

| Updated on: Oct 08, 2023 | 4:27 PM

VIDEO | टोल दरवाढीवर मनसेचे राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले आहे. आणि यासंदर्भातच येत्या काही दिवासात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज ठाकरे हे भेट घेणार आहे. यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना कशासाठी भेटावं? सरळ धमकी देवून टाकावी

छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर 2023 | महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. इतकंच नाही तर लोकसभेसाठी सभाव्य उमेदवारांची नाव देखील समोर आली आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केले आहे. ‘आतापर्यंत मनसेने दोन ते तीन वेळेत उमेदवार उभे केले होते. मात्र त्यावेळी मनसे जी परिस्थिती होती तिच आता आहे. त्यात कोणताही बदल नाही. मात्र त्यांनी लोकसभा लढवावी, प्रत्यक्षात काय होईल त्यांना ही कल्पना नाही’, असे खैरे म्हणाले तर टोल दरवाढीवर मनसेचे राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले आहे. आणि येत्या काही दिवासात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. यावर खैरे म्हणाले, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना कशासाठी भेटावं? सरळ धमकी देवून टाकावी. तर म्हैसकर यांचा व्यवसाय आहे त्यांच्याबद्दल आपण काय बोलावं, असंही खैरे म्हणालेत.

Published on: Oct 08, 2023 04:27 PM
काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी? काँग्रेसच्या बैठकीच्या बॅनरवर रवींद्र धंगेकर यांचाच फोटो नाही
Chandrakant Khaire असं का म्हणाले? मी कधीही कोणाच्या मुंड्या कापल्या नाहीत