विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटून काहीही गोलमाल करू शकतात पण…, चंद्रकांत खैरे यांचं मोठं भाष्य
पाच बंडखोर आमदार संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत आणि आम्ही सर्व उत्सुक आहोत असे म्हणत आमदार आपात्रता प्रकरणावरील लागणारा उद्याता निकाल हा उद्धव ठाकरे यांच्याबाजूनेच लागेल, असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी विश्वास व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर, ९ जानेवारी २०२४ : आमदार अपात्र प्रकरणावर उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहे. यानिकालाकडून ठाकरे गटाला मोठ्या अपेक्षा आहे. मात्र निकाल काय लागतो याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केले आहे. पाच बंडखोर आमदार संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत आणि आम्ही सर्व उत्सुक आहोत असे म्हणत आमदार आपात्रता प्रकरणावरील लागणारा उद्याता निकाल हा उद्धव ठाकरे यांच्याबाजूनेच लागेल, असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी विश्वास व्यक्त केला. तर विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांकडे जायची गरज नव्हती. पण निकाल आमच्या बाजूने लागू शकतोच असे म्हणत असताना चंद्रकांत खैरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर शंका व्यक्त केली.
तर विधानसभा अध्यक्ष हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन काहीही गोलमाल करू शकतात पण आम्हाला सुप्रीम कोर्ट आहे आणि आमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास असल्याचेही वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. येणाऱ्या लोकसभेत संदीपान भुमरे यांच्या म्हणण्यानुसार चंद्रकांत खैरै यांना लाखो मतांनी पराभूत करणार असा सवाल विचारला असता लोकसभेसाठी संदीपान भुमरे यांनी मैदानात यावे, मी एकनिष्ठ आहे, संभाजीनगरच्या लोकांना एकनिष्ठ लोकं आवडतात, बंडखोर नाही, असं म्हणत त्यांनी खोचक टोला लगावला.