‘आमची भावना गवळी आता रडत बसली असेल’, कुणी लगावला टोला?

| Updated on: Apr 04, 2024 | 5:01 PM

'भावना गवळीला सांगितलं होतं कुठे जाऊ नको, पण ऐकलं नाही. ईडी चौकशी लागली पण त्यांनी काढली का ईडी? पण तरी भावना गवळी यांनी गद्दारी केली. किमान पक्षासोबत एकनिष्ठ तरी राहिली असती.', ठाकरे गटाच्या बड्या नेत्यांचा भावना गवळींना खोचक टोला

आपला विरोधक खूप स्ट्रॉग आहे आणि त्याला आपल्याला पाडायचा आहे, असं करूनच त्या ठिकाणी त्याला आपल्याला पाडायचं आणि आपण जिंकायचं, अशी आमची भूमिका असणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. तर संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यावरून महायुतीचा गोंधळ चालू असल्याचाही चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं. पुढे ते असेही म्हणाले की, भावना गवळीला सांगितलं होतं कुठे जाऊ नको, पण ऐकलं नाही. ईडी चौकशी लागली पण त्यांनी काढली का ईडी? पण तरी भावना गवळी यांनी गद्दारी केली. किमान पक्षासोबत एकनिष्ठ तरी राहिली असती. भावना गवळी यांची उमेदवारी कापली आहे आणि ती आता रडत बसलेली असेल. मी भावना गवळी यांना सांगितलं होतं की कुठेही जाऊ नका, पण त्यांनी ऐकलं नाही, असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आणि निशाणा साधला.

Published on: Apr 04, 2024 05:01 PM
आनंदराज आंबेडकर लोकसभेचा अर्ज मागे घेणार? ‘वंचित’नं काय केली विनंती?
काळजी घ्या… राज्यात एप्रिल, मे महिन्यात कसं असणार तापमान? हवामान विभागाचं आवाहन काय?