Chandrakant Khaire असं का म्हणाले? मी कधीही कोणाच्या मुंड्या कापल्या नाहीत
VIDEO | इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सहभागी होणार की नाही? प्रकाश आंबेडकर लवकरच महविकास आघाडीसोबत म्हणजेच इंडिया आघाडीत येणार? इंडिया आघाडीमध्ये लवकरच प्रकाश आंबेडकर सहभागी होतील, असं ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटले
छत्रपती संभाजीनगर, ८ ऑक्टोबर २०२३ | आगामी लोकसभा निवडणुकीवर भाष्य करताना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी जनतेने दाखवलेल्या विश्वासावर आभार व्यक्त केले आहे. संभाजीनगरमध्ये जेव्हा मी निवडून आलो तेव्हा मी चांगलं काम केलं. छत्रपती संभाजीनगर दहा वर्ष पाठीमागे गेल्यास आणि पाहिलं तर मी कधीही कोणाच्या मुंड्या कापल्या नाहीत. मी सर्वांना सोबत घेवून काम केलं. थोडक्या मताने माझा पराभव झाला. इम्तियाज जलील सारखा दृष्ट माणूस निवडून आला. त्यामुळे सध्या जातीय वातावरण खराब झालं आहे. उद्धवसाहेब ठाकरे माझ्यासाठी स्वतः निर्णय घेतील. संभाजीनगरचं राजकारण खूप वेगळं आहे, असे चंद्रकांत खैरे म्हणाले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर हे सहभागी होणार की नाही? यावर बोलताना ते म्हणाले, ‘वंचित बहुजन आघाडी सर्वच लोकसभा निवडणुका लढवणार नाही. त्यांचं उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यांची आमच्यासोबत युती म्हणजेच महविकास आघाडीसोबत आहे. इंडिया आघाडीत लवकरच प्रकाश आंबेडकर सामील होतील’