सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा निकाल सर्वोच्च न्यायालय जरी देणार असला तरी…, काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
VIDEO | ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांची सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया
औरंगाबाद: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात निकालाची अपेक्षा होती. मात्र या प्रकरणावरील निकाल पुढे
ढकलण्यात आला आहे. यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. आम्हालाही आज कोणतातरी निकाल येईल याची आशा होती. मात्र या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी ढकलण्यात आली आहे. असे असले तरी सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने निकाल लागू दे असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी देवा चरणी प्रार्थना केली आहे. यासह ते असेही चंद्रकांत खैरै म्हणाले की, सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा निकाल सर्वोच्च न्यायालय जरी देणार असला तरी या प्रकरणाच्या निकालाची अपेक्षा परमेश्वराकडे करतो.
Published on: Feb 17, 2023 12:22 PM