कचोरी ताई आणि चकली… शितल म्हात्रे आणि किशोरी पेडणेकर पुन्हा भिडल्या, बघा काय जुंपली?

| Updated on: Nov 09, 2023 | 12:09 PM

ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे पुन्हा एकदा भिडल्या. कोरोना काळातील कथित घोटाळ्याच्या आरोपांवरून किशोरी पेडणेकर यांची चौकशी होतेय. यावरून शितल म्हात्रे यांनी ट्वीट करून किशोरी पेडणेकर यांना डिवचलं आणि त्यानंतर दोघांमध्ये ट्वीटर वॉर सुरू झालंय.

मुंबई, ९ नोव्हेंबर २०२३ | ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे पुन्हा एकदा भिडल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना काळातील कथित घोटाळ्याच्या आरोपांवरून किशोरी पेडणेकर यांची चौकशी होतेय. यावरून शितल म्हात्रे यांनी ट्वीट करून किशोरी पेडणेकर यांना डिवचलं आणि त्यानंतर दोघांमध्ये ट्वीटर वॉर सुरू झालंय. शितल म्हात्रे यांनी किशोरी पेडणेकर यांचा उल्लेख कचोरी ताई केलाय. कचोरी ताई दिवाळीच्या चकल्या यंदा जेलमध्येच खाणार. दिवा पण फडफडून विझणार अशी टीका केली तर यावर पेडणेकर म्हणाल्या शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर पक्ष निष्ठेची चकली बनवेल. पण त्याच्यासाठी लागणारा दांडा कुठे आहे? असा सवाल पेडणेकर यांनी केलाय. मेलेल्या सासऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन बसली त्याचं काय असेही त्या म्हणाल्या. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट.

Published on: Nov 09, 2023 12:09 PM
कुणबी दाखल्यांना विरोध करणारे एकमेव छगन भुजबळ आरपारच्या तयारीत
Mumbai Weather : ढासळत्या वातारणामुळे हवामान खात्याकडून मुंबईत येलो अलर्ट, येत्या २४ तासांत ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस