तेव्हा क्लिप नव्हत्या का? किशोरी पेडणेकर यांचा नारायण राणे यांना खोचक सवाल, बघा काय म्हणाल्या?
VIDEO | नारायण राणे यांच्या 'त्या' टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी काय दिलं प्रत्युत्तर बघा
जालना : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी खोक्यांचे व्यवहार केले आणि ते व्यवहार करतानाचे क्लिप आपल्याकडे आहेत, असे म्हणाले होते. यावर ठाकरे गटाच्या नेत्या आक्रमक होत त्यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे फुटले तेव्हा त्यांच्या क्लिप नव्हत्या का.? नारायण राणे यांना दोनदा पाडलं. एका महिलेने पाडलं तेव्हा क्लिप नव्हत्या का.? असा सवाल करत किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आजकाल महाराष्ट्रात जितके खोट बोलाल, तेवढा तो चांगला नेता असतो. असे दिसायला लागलाय असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या वरील राणेंच्या टिकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Published on: Feb 27, 2023 09:02 PM