महायुतीकडून मिलिंद नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?

| Updated on: Apr 21, 2024 | 2:28 PM

उद्धव ठाकरे यांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर हे महायुतीकडून लोकसभा लढणार असल्याचे सांगितले जातेय. तर महायुतीकडून दक्षिण मुंबईत मिलिंद नार्वेकर यांचं नाव चर्चेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

दक्षिण मुंबई येथील लोकसभेची जागा ही शिंदे गटाकडे आहे मात्र या जागेवर उद्धव ठाकरे यांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर हे महायुतीकडून लोकसभा लढणार असल्याचे सांगितले जातेय. तर महायुतीकडून दक्षिण मुंबईत मिलिंद नार्वेकर यांचं नाव चर्चेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तर भाजप उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारी आहे. यानुसार, ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांना दक्षिण मुंबई येथील लोकसभेच्या जागेवर उमेदवारी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, दक्षिण मुंबईत ठाकरे गटाने अऱविंद सावंत यांनी लोकसभेचं तिकीट दिलं आहे. अरविंद सावंत यांनी मुंबईत यापूर्वीच लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केलाय. तर दक्षिण मुंबईच्या जागेसाठी महायुतीकडून मोठी खळी खेळली जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांनी दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. मात्र नार्वेकर यावर काहीही बोलले नसल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होताना दिसताय.

Published on: Apr 21, 2024 02:28 PM
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?
निषेध… निषेध… No वोट, मुंबईच्या ‘या’ भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार