ठाकरे गटाच्या मागे ससेमिरा, आणखी एका नेत्याला ईडीनं बजावलं समन्स, काय आहे प्रकरण?

| Updated on: Jan 21, 2024 | 3:54 PM

नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच ठाकरे गटाचे नेते आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाड टाकली. वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि घरी अशा एकूण चार ठिकाणी ईडीने छापेमारी केली. आता याच जोगेश्वरी भूखंड प्रकरणात वायकर यांना ईडीने समन्स बजावले आहे. मंगळवारी रवींद्र वायकर यांची चौकशी होणार आहे.

मुंबई, २१ जानेवारी २०२४ : नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच ठाकरे गटाचे नेते आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाड टाकली. वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि घरी अशा एकूण चार ठिकाणी ईडीने छापेमारी केली. जोगेश्वरी भूखंड प्रकरणात ही धाड टाकण्यात आली होती. तर मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर वायकर यांनी महापालिकेकडून कोणतीही परवानगी न घेता पंचतारांकित हॉलेट बांधलंय, हा सुमारे ५०० कोटींचा घोटाळा असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. सप्टेंबरमध्ये वायकर यांच्या विरूद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आता याच जोगेश्वरी भूखंड प्रकरणात वायकर यांना ईडीने समन्स बजावले आहे. मंगळवारी रवींद्र वायकर यांची चौकशी होणार आहे. जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

Published on: Jan 21, 2024 03:51 PM
Ram Mandir Inauguration : मंत्रिमंडळासह सर्वजण अयोध्येला जाणार? अजित पवार उद्याच्या सोहळ्याबद्दल काय म्हणाले?
मूर्खांना मी उत्तर देत नाही, देवेंद्र फडणवीस यांनी ‘तो’ फोटो ट्वीट करण्याचं कारण सांगत कुणाला फटकारलं?