शिंदे गट हा भाजपचं पिल्लू, ठाकरे गटातील ‘या’ नेत्यांचा खोचक टोला
शिंदे गट हा शिवसेनेचा नाहीच तर शिंदे गट हा भाजपचं पिल्लू आहे आणि लवकरच ते भाजप या पक्षात विलीन होणार आहे. त्यामुळे बाळासाहेबांची असलेली शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचे नितीन देशमुख यांनी म्हटले आहे.
बेईनामी संपत्ती गोळा केली असा आरोप ठाकरे गटातील नेते नितीन देशमुख यांच्यावर करण्यात येत आहे, या आरोपावर उत्तर देताना नितीन देशमुख म्हणाले, बेईनामी संपत्ती गोळा केली या आरोपामुळे मला जेलमध्ये टाकतील, यामुळे मी कपडे गोळा करून आलो आहे. मी सांगितले किरीट सोमय्यांचं घर माझंच आहे, मी त्यांना ते घेऊन दिले आहे. त्यामुळे एसीबीने ते खाली करावं, माझ्या ताब्यात टाकावं, असे ते म्हणाले आहे. पुढे ते असेही म्हणाले की, शिंदे गट हा शिवसेनेचा नाहीच, तर शिंदे गट हा भाजपचं पिल्लू आहे आणि लवकरच ते भाजप या पक्षात विलीन होणार आहे. त्यामुळे बाळासाहेबांची असलेली शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Published on: Jan 17, 2023 01:43 PM