सचिन अहिर यांनी मंत्री उदय सामंत याच्या गळ्यात घातली शाल अन् म्हणाले…

| Updated on: Dec 14, 2023 | 2:22 PM

एकीकडे विधानभवन परिसरात विधानभवनाच्या पायऱ्यांवर सर्वपक्षीय नेत्यांनी फोटोसेशन केल्याचे पाहायला मिळाले . तर दुसरीकडे ठाकरे गटातील नेता आणि शिंदे गटातील नेता यांच्यात आज मिश्कील संवाद झाल्याचे बघायला मिळाले. विधानभवन परिसरात ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सामंत यांच्या गळ्यात शाल घातली.

नागपूर, १४ डिसेंबर २०२३ : राज्याच्या विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू असून आज चौथा दिवस आहे. अधिवेशन काळात विधानभवन परिसरात दिवसाच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळते. आज एकीकडे विधानभवन परिसरात विधानभवनाच्या पायऱ्यांवर सर्वपक्षीय नेत्यांनी फोटोसेशन केल्याचे पाहायला मिळाले. या फोटोसेशनमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सहभागी झाले होते. तर दुसरीकडे ठाकरे गटातील नेता आणि शिंदे गटातील नेता यांच्यात आज मिश्कील संवाद झाल्याचे बघायला मिळाले. विधानभवन परिसरात ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सामंत यांच्या गळ्यात शाल घातली. यानंतर सचिन आहिर यांनी उदय सामंत यांना खोचक टोलाही लगावला. सचिन अहिर यांनी उदय सामंत यांच्या गळ्यातील शाल त्यांच्याच गळ्याभोवती फिरवत फास लागणार नाही याची काळजी घ्या. ही शाल फाशीचा फंदा आहे, हे लक्षात ठेवा असा टोला लगावला.

Published on: Dec 14, 2023 02:22 PM
संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेला ‘हे’ प्रसिद्ध वकील कायदेशीर मदत करणार
बबनराव लोणीकर यांच्याकडून राजेश टोपे यांना शिवीगाळ, ऑडिओ क्लीप व्हायरल; काय आहे प्रकरण?