निकाल आपल्या बाजूने येईल हा आत्मविश्वास कुठून येतो? संजय राऊत यांचा सवाल

| Updated on: Feb 16, 2023 | 4:21 PM

VIDEO | देशातील न्याय मेलेला नाही, सत्तासंघर्षाच्या सुनावणीनंतर काय म्हणाले संजय राऊत?

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. त्यावर आज सुनावणी पूर्ण झाली असून दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शिंदे गटाचे वकील आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी कायदेशीर तथ्य आणि सत्तांतराच्या घटनाक्रमावर जोरदार युक्तिवाद केला. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत निकाल राखून ठेवला आहे. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी न्यायालयापासून निवडणुकीपर्यंत आणि भाजपचे वरिष्ठनेते यांच्यापासून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर नुकतीच सुनावणी पार पडली आहे. त्या सुनावणीकडे उद्धव ठाकरे यांच्यासह माझे बारीक लक्ष होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजप, फुटीर गटाचे नेते, नारायण राणे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केले आहे. ते वारंवार सांगत आहे की, निकाल आमच्याच बाजूने येईल असे म्हणत आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Feb 16, 2023 04:21 PM
जितेंद्र आव्हाडांवर केले जाणारे आरोपांबाबत राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा खुलासा; म्हणाले…
अजित पवार कॅमेरे बघताच तडका-फडकी गाडीत बसून निघून गेले अन्…