लोकांना धर्मकारणात धुंद करून नशेबाज करायचे आणि…, ‘सामना’तून थेट पंतप्रधान मोदीं यांच्यावर हल्लाबोल
VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक 'सामना'तील 'रोखठोक' मधून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला हल्लाबोल
मुंबई : कर्नाटकच्या प्रचारात बजरंगबलीची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात बंजरंग दलावर बंदी घालू असे सांगितले आणि कर्नाटकचा प्रचार जय बंजरंगबलीवरून तापला. कर्नाटकची निवडणूक आता बंजरंग दलाच्या दिशेने आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंगबली म्हणा आणि मतदान करा असं आवाहनच केले आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. नऊ वर्ष राज्य करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुका जिंकण्यासाठी श्रीरामापासून बजरंगबलीपर्यंतचे हिंदू देव लागतात. लोकांना धर्मकारणात धुंद करून नशेबाज करायचे आणि निवडणुका जिंकायच्या. हिटलर आणि खोमेनीचे हे मिश्रण आहे. देशाला ते परवडणारे नाही. देश अशाने संपून जाईल. पुन्हा कुणाचा तरी गुलाम होईल. त्यामुळे लोकांनी एकवटायला हवे. निर्भय व्हावे लागेल, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदरातून हा हल्ला चढवला आहे. तर धर्माचे राजकारण आणि व्होट बँकेचे राजकारण घटना रोखू शकत नाही. देशाचा आजचा गोंधळ सावरण्यास घटना अपुरी पडत आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.