अजित पवार यांचा दावा, संजय राऊत म्हणाले, ‘ते’ गाफिल नव्हते पण विश्वासातल्या माणसांनीच…
अजित पवार यांच्या दाव्याला राऊतांचा दुजोरा, संजय राऊत यांनाही होता बंडखोरीचा सुगावा?
मुंबई : शिवसेनेत झालेल्या बंडाची कुणकुण आम्हाला होती, त्यासंदर्भात आम्ही उद्धव ठाकरेंना सूचित केले होते, सर्व आमदार जात असतानाही उद्धव ठाकरे गाफिल होते, असा दावा अजित पवार यांनी केला होता. अजित पवार यांच्या या वक्तव्याला संजय राऊत यांनीही दुजोरा दिला आहे. संजय राऊत याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘ अजित पवारांनी वारंवार सांगितलं आहे. उद्धव ठाकरे हे गाफील राहिले म्हटल्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला, असं म्हणता येईल. विश्वासातल्या माणसाकडूनच विश्वासघात होत असतो. अजित पवारांनाही ते माहिती आहे. पण आम्हीही या सगळ्या हालचाली उद्धव ठाकरेंना सांगत होतो. सुगावा सगळ्यांनाच लागला होता. तरीही हे लोकं विश्वासाचे आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितेल.
Published on: Feb 04, 2023 11:49 AM