‘… तर प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांचे घर फोडू’, कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?

| Updated on: Nov 22, 2024 | 1:59 PM

ठाकरे गट शिवसेनेचे उपनेते, शरद कोळी यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची गाडी फोडण्याचं वक्तव्य केलं होतं. इतकंच नाहीतर युवक काँग्रेसकडून थेट शरद कोळी यांच्या कार्यालयाबाहेर जेव्हा त्यांची गाडी लागेल, तेव्हा ती फोडली जाईल, असा इशारा दिला होता. असा इशारा दिल्यानंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक

दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गट शिवसेनेतील वाद चांगलाच चिघळल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गट शिवसेनेचे उपनेते, शरद कोळी यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची गाडी फोडण्याचं वक्तव्य केलं होतं. इतकंच नाहीतर युवक काँग्रेसकडून थेट शरद कोळी यांच्या कार्यालयाबाहेर जेव्हा त्यांची गाडी लागेल, तेव्हा ती फोडली जाईल, असा इशारा दिला होता. असा इशारा दिल्यानंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. अशातच त्यांनी थेट प्रणिती शिंदे यांचं घर फोडण्याचा इशारा दिला आहे. शरद कोळी यांची गाडी फोडल्यास खासदार प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांचे घर फोडू असे म्हणत ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा काँग्रेसला सज्जड दम भरला आहे. काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शरद कोळींच्या कार्यालयाबाहेर बांगड्या आणि चप्पल दाखवत आंदोलन केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नारायण राणेंसारख्या गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांना शरद कोळी पुरून उरलेत त्यामुळे तुम्ही तर किरकोळ आहात, असं म्हणत एकप्रकारे इशाराच दिला आहे.

Published on: Nov 22, 2024 01:59 PM
Sanjay Raut : ‘एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय’; मविआला किती जागा? थेट आकडा सांगत राऊतांचा दावा
Rohit Pawar : ‘मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या 25-30 कार्यकर्त्यांचा…’, रोहित पवार यांचा गंभीर आरोप