Sharad Koli : चिंधी चोर म्हणत नितेश राणे यांची कुणी काढली अक्कल?

| Updated on: Oct 20, 2023 | 5:47 PM

VIDEO | नाशिकमधील ड्रग्स रॅकेटच्या विरोधात आज ठाकरे गटाने प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता. संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला होता. यावर नितेश राणे यांनी सडकून टीका केली होती. त्यावर ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी प्रत्युत्तर दिले आहे, बघा काय म्हणाले?

जळगाव, २० ऑक्टोबर २०२३ | नाशिकमधील ड्रग्स रॅकेटच्या विरोधात आज ठाकरे गटाने प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला होता. यावर नितेश राणे यांनी सडकून टीका केली होती. त्यालाच ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘चिंधी चोर नितेश राणे याला कुत्रं सुद्धा विचारत नाही. आम्ही जो मोर्चा काढला आहे, तो गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. नितेश राणे हे स्वतः गुन्हेगार आहेत. गुन्हेगार झाकून ठेवण्यासाठी ते अशा पद्धतीची टीका करत आहेत.’ असे शरद कोळी म्हणाले तर महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करायचा तर त्याची सुरूवात ही मातोश्रीपासून करण्यात यावी, या टीकेवर बोलताना ते म्हणाले, नितेश राणे यांना अक्कल नाही. महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करायचे असेल तर गुजरातपासून सुरुवात करायला हवी. तर आम्ही काय करायचे किंवा नाही करायचे हे आम्हाला शिकवू नये, असे म्हणत नितेश राणेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.

Published on: Oct 20, 2023 05:47 PM
Chandrakant Patil : माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात… चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?
Devayani Farande : सकाळी उठून भांग घेणाऱ्या संजय राऊत यांची नार्को टेस्ट करा, ‘या’ महिला आमदाराची मागणी