‘देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे डोंबाऱ्यासारखे नाचतायत’, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका

| Updated on: Apr 02, 2023 | 3:16 PM

VIDEO | महाविकास आघाडीच्या सभेमुळे भाजप आणि शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकलीय, कुणी केला हल्लाबोल

बीड : महाविकास आघाडीच्या संभाजीनगर येथे होणाऱ्या जाहीर सभेला अवघे काही तास उरले आहेत. या वज्रमूठ सभेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून राज्यभरातील महाविकास आघाडीचे नेते मंडळी आणि कार्यकर्ते संभाजीनगरच्या दिशेने रवाना होत आहेत. दरम्यान, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या भितीपोटी महाविकास आघाडी किंवा ठाकरे गट अशा सभा घेत असल्याचा आरोपही केला जात आहे. यावर ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले महाविकास आघाडीला कोणाचीही भीती नाही. भाजप आणि शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकरली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांची धास्ती घेतली असून त्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे कायद्याचा गैरवापर करून गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांचे हरासमेंट केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपच शिवसेनेचा हात धरून आजपर्यंत राजकारण करत आले आहेत. आता भाजपला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे डोंबाऱ्यासारखे नाचत आहे. भाजपकडून राज्यात हुकूमशाही आणण्याचे काम सुरू आहे. ते मोडीत काढण्याचे काम आज आम्ही वज्रमूठ सभेद्वारे करणार आहोत, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

Published on: Apr 02, 2023 03:16 PM
बागेश्वर बाबा, कालीचरण महाराजांवरून आव्हाड भडकलेच म्हणाले, या सरकारला…
हाती मशाल, उद्धव ठाकरेंच्या सभास्थळापर्यंत अनवाणी प्रवास; कोण आहे ‘तो’ निष्ठावंत?