1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटातील नेता, नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवला ‘तो’ फोटो अन्…
सुधाकर बडगुजर हे नाशिकचे ठाकरे गटाचे पदाधिकारी असून सुधाकर बडगुजर यांची चौकशी करा, अशी मागणी भर सभागृहात नितेश राणे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तर सलिम कुत्ता याच्यासोबत सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा मुद्दा नितेश राणे यांनी उपस्थित केला
मुंबई, १५ डिसेंबर २०२३ : नागपूर येथे राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आजच्या दिवशीही सभागृहात अनेक महत्त्वाचे मुद्दे गाजल्याचे पाहायला मिळले. अशातच भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी विधानभवानमध्ये थेट एक फोटो दाखवून ठाकरे गटातील नेत्यावर हल्लाबोल केला. सुधाकर बडगुजर १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत काय करत होते? अशा सवाल नितेश राणे यांनी थेट फोटो दाखवत सभागृहात केला. इतकच नाहीतर सुधाकर बडगुजर हे नाशिकचे ठाकरे गटाचे पदाधिकारी असून सुधाकर बडगुजर यांची चौकशी करा, अशी मागणी भर सभागृहात नितेश राणे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तर सलिम कुत्ता याच्यासोबत सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा मुद्दा नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित करत थेट पेनड्राईव्ह बॉम्बच टाकला.
Published on: Dec 15, 2023 01:34 PM