चंद्रशेखर बावनकुळेंसाठी कायदा वेगळा? नागपुरातील ‘त्या’ अपघातावरून सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

| Updated on: Sep 09, 2024 | 5:00 PM

नागपूर शहरात रविवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघात ऑडी कारने दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिली होती. कारचालक हा चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. बघा काय केलं ट्वीट?

नागपूर शहरात रविवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत ऑडी कार चालकाने एका दुचाकीसह काही वाहनांना धडक जिली. हा अपघात भीषण असल्याने ऑडी कारच्या धडकेत वाहनांचा चेंदामेंदा झाला. दरम्यान, हा अपघात राजकीय नेत्याच्या मुलाच्या कारने झाल्याची चर्चा होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे हा कारमध्ये असल्याची माहिती होती. सीताबर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑडीकार बावनकुळेंचा मुलगा नाहीतर त्यांच्या ड्रायव्हर चालवत होता. अशातच नागपूरच्या अपघातावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्वीट केले आहे. ‘रविवारी रात्री नागपूरच्या रामदासपेठमध्ये महागड्या इलेक्ट्रॉनिक ऑडीने अनेक गाड्या उडवल्या. मध्यधंद अवस्थेत असलेल्या चालक संकेत बावनकुळे असल्याचे समोर येत आहे. मात्र आश्चर्य की RTOनी गाडीचा नंबर न नोंदवता ही गाडी सोडून दिली. चंद्रशेखर बावनकुळें साठी कायदा वेगळा का?’ असा सवाल सुषमा अंधारेंनी केला.

Published on: Sep 09, 2024 05:00 PM