एसटी प्रवासात ५० टक्के सूट देण्यापेक्षा…, सुषमा अंधारे यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Mar 18, 2023 | 7:31 PM

VIDEO | राज्य सरकारची धोरणं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकाकरकडून करण्यात आलेल्या घोषणांबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची जोरदार टीका

अंबाजोगाई : शिवसेनेच्या उपगटनेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेतून सरकारवर आणि एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. दरम्यान, सुषमा अंधारे सध्या अंबाजोगाई दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकाकरकडून करण्यात आलेल्या घोषणांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. शिंदे सरकाने नुकताच राज्यातील महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली या निर्णयावर सुषमा अंधारे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. महिलांना एसटीच्या प्रवासात सूट दिली असली तरी महागाई आणि बेरोजगारी काही कमी झालेली नाही. गॅस सिलिंडरच्या किंमती प्रचंड वाढलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासाचा फायदा जरी महिलांना होणार असला तरी महागाईमुळे सामान्य लोकं त्रस्त आहेत. त्यामुळे एसटी प्रवासात सूट देण्यापेक्षा गॅस सिलिंडचा दर कमी करून महिलांना दिलासा दिला असता तर त्याचा खरा फायदा महिलांना मिळाला असता, अशी टीका सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर केली आहे.

Published on: Mar 18, 2023 07:24 PM
गोपीनाथ मुंडे हयात असते तर…, ‘तो’ भावनिक किस्सा सांगतना छगन भुजबळ भावूक
आमची संधी घालवली हे खरंय पण…, बाळासाहेब थोरात यांनी सल व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचं केलं जाहीर कौतुक