सुषमा अंधारे यांनी सुचवलं ‘भाजप’ला नवं नाव; म्हणाल्या, भाजप सोडून शोभेल ‘हे’ नाव
VIDEO | सुषमा अंधारे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला जोरदार हल्लाबोल, बघा काय केली टीका
मुंबई : कोणी कितीही धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरला, लांगुलचालन केलं तरी त्यांच्या मानन्या न मानण्याने आम्हास फरक पडत नाही ! भारत हे हिंदुराष्ट्र होते, हिंदुराष्ट्र आहे आणि हिंदुराष्ट्र राहिल, असे ट्विट भाजपकडून करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, ‘मी याकडे चांगल्या अर्थाने पाहते. जर हे हिंदुराष्ट्र असेल आणि ते हिंदुराष्ट्रच मानायचे असेल तर या राज्यातील सर्व धर्माचे लोकं वाऱ्यावर सोडून द्यायचे असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण जर असंच असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी न ठेवता ते बदलून ते हिंदुस्तान जनता पार्टी करावं’, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Published on: Apr 13, 2023 07:38 PM