तर गुलाबराव पाटील यांच्या मनातलं सांगितलं असतं, सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

| Updated on: Feb 25, 2023 | 2:27 PM

VIDEO | गुलाबराव पाटील यांची कोणती विधाने खरी, कोणती खोटी? सुषमा अंधारे यांचा खोचक सवाल

परभणी : एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर गेला. त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली, असं वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं, यावर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी खोचक टीका केली आहे. गुलाबराव पाटील यापूर्वी खोटं बोलत होते असं समजावं का, या आधी गुलाबराव म्हणत होते मी हिंदुत्व वाचवायला गेलो, मला साहेब भेटत नव्हते म्हणून गेलो. त्यामुळे ते आता खोटं बोलता येत की पहिले खोटं बोलत होते, त्यामुळे त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही तेव्हाचे खरे होते की आताचे खरे आहेत, असे म्हणत खोचक सवाल सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांनी विचारला आहे. दरम्यान, आताच गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य का केलं, यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, माझ्याकडे बागेश्वर बाबाची सिद्धी नाही त्यामुळे आता गुलाबराव पाटील असं का विधान करतात हे मी सांगू शकत नाही…

Published on: Feb 25, 2023 02:27 PM
Video : बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न अन् औरंगाबादचं नामांतर; छगन भुजबळ यांची सविस्तर प्रतिक्रिया…
औरंगाबादचं नाव बदलल्याने गोपीचंद पडळकर यांच्याकडून सरकारचे आभार; ‘या’ शहराचंही नाव बदलण्याची मागणी