Sushma Andhare यांनी शालिनी ठाकरे यांना पुन्हा डिवचलं म्हणाले, ‘तुमच्या आतड्याला पिळ…’

| Updated on: Oct 07, 2023 | 10:23 AM

VIDEO | ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांच्यावर सडकून टीका, ट्वीट करून पुन्हा डिवचलं, म्हणाले, 'मी नि:शस्त्र एकटी यायला तयार आहे, पण खरं सांगा, नांदेड संभाजीनगर रूग्णालयातील गेलेले बळी याबद्दल तुमच्या आतड्याला अजिबात पिळ पडत नाही का?'

मुंबई, ७ ऑक्टोबर २०२३ | ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांच्यावर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या नातवावर बोललात तर तुमच्या कानाजवळ येऊन डीजे वाजवू, इतका वाजवू की अंधारे यांना खरंच अंधार दिसेल, असे म्हणत काल शालिनी ठाकरे यांनी सडकून टीका केली होती. या टीकेवर सुषमा अंधारे यांनी शालिनी ठाकरे यांना डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. सुषमा अंधारे यांनी ट्वीट करत असे म्हटले की, भडकले… गुरगुरले… डीजे…जाळ… डरकाळी… अरे बापरे… बाई, ठिकाण, वेळ, दिवस तुम्ही ठरवा. मी नि:शस्त्र एकटी यायला तयार आहे. पुढे सुषमा अंधारे यांनी असेही म्हटले की, पण खरं सांगा, नांदेड संभाजीनगर रूग्णालयातील गेलेले बळी याबद्दल तुमच्या आतड्याला अजिबात पिळ पडत नाही का? असा सवाल करत शालिनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे तर मी मुद्द्यावर बोलतेय, चिप पब्लिसिटीसाठी लुडबुड का करताय? असा खोचक टोलाही लगावला आहे.

Published on: Oct 07, 2023 10:21 AM
NCP Symbol Hearing | आयोगाच्या सुनावणीत नेमकं काय झालं? अजित पवार गट-शरद पवार गटाने काय केले दावे?
Amol Mitkari यांच्या ‘त्या’ टीकेवर मनसेनं दिला थेट हातपाय तोडण्याचा इशारा