सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना डिवचलं, म्हणाल्या, ‘डीजे, डॉल्बीचा नातवाला त्रास म्हणून…’

| Updated on: Oct 04, 2023 | 5:33 PM

VIDEO | गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सण-उत्सवांबाबत चिंता व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले तर मिरवणुकांवेळी डीजे, डॉल्बीच्या आवाजावर देखील त्यांनी भाष्य केले. यावरून सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३ | राज्यभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव पार पडला आणि बाप्पाला निरोप देण्यात आला. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सण-उत्सवांबाबत चिंता व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले तर मिरवणुकांवेळी डीजे, डॉल्बीच्या आवाजावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. यासंदर्भात राज ठाकरे ट्वीट केले. ‘२४ तास आवाज कानावर पडून अनेकांची श्रवण शक्ती कमी झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको. आपल्या आनंदाची, उत्सवाची मोजावी लागणारी ही किंमत ही मोठी नाही का?’ असे म्हणत राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला होता. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याच मुद्द्यावर लक्ष वेधत नाव न घेता राज ठाकरे यांना डिवचलं आणि अप्रत्यक्षपणे टीका केली. ‘एका बड्या नेत्याच्या घरासमोरून मिरवणूक चालली त्याचा आपल्या नातवाला त्रास होतोय म्हणून हा बडा नेता भाष्य करेल. नेत्यांच्या नातवाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. मात्र गोर गरिबाचं मुलही चांगलं राहिलं पाहिजे. नुसतं दुपारी उठून कसं चालेल’, अशी खोचक टीका अंधारे यांनी केली.

Published on: Oct 04, 2023 05:33 PM
उपचार सुरू असताना डॉक्टरच्या हातून नवजात बाळ पडलं अन्…
Ujjwala Yojana : मोदी सरकारचा गॅस सिलेंडरबाबत मोठा निर्णय, घरगुती गॅसचे दर पुन्हा झाले कमी