चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली ताकद, कुवत ‘या’साठी वापरावी, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

| Updated on: Apr 04, 2023 | 11:34 PM

VIDEO | ... त्याच देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांना साईडलाईन केलं अन् आशिष शेलारांचं तिकीट कापलं, नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे

पुणे : ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘फडतूस’ असे म्हणत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तर यावर भाजप आक्रमक होत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना अशाच टीका भाजपवर करत राहाल तर घराच्या बाहेर पडणं मुश्कील होईल असे म्हटले. दरम्यान यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली ही इशारा देण्याची कुवत, ताकद आणि शक्ती जी आहे ती उमेदवारीचं तिकीट मिळवण्यासाठी वापरावी’, असे सुषमा अंधारे म्हणाले. तर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जी ताकद दाखवताय, मात्र तेच तुम्हाला संपवायला बसलेत असे म्हणत जोरदार निशाणा साधला.

Published on: Apr 04, 2023 11:33 PM
नवनीत राणा यांचा जन्म ६ की १५ एप्रिलचा? ‘टीसी’वरून नवा वाद, कुणाचा सवाल
गुलाबराव पाटील यांच्या कार्यक्रमात बत्ती गुल अन्… , कुठं घडला प्रकार