तर हे देवेंद्र फडणवीस यांचं अपयश, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

| Updated on: Mar 17, 2023 | 7:33 AM

VIDEO | अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणावरून ठाकरे गटात्या नेत्या सुषमा अंधारे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका

मुंबई : अमृता फडणवीस यांना धमकी आणि ब्लॅकमेलिंग करण्यात आल्याचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. दरम्यान, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये याच प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल जात असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर अवलंबून न राहता गुजरातच्या गृहमंत्र्यांची मदत घ्यायला हवी, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे यांनी ट्विटवर ट्विट करून ही टीका केली आहे. अत्यंत सात्विक, सत्वशील, भ्रष्टाचाराचा भ सुद्धा माहीत नसलेल्या गृहमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना जर धमकावलं जात असेल तर ते गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे. पण आम्हाला असे वाटते की, टीका करण्याची ही वेळ नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 17, 2023 07:33 AM
फडणीस प्रकरणावरून म्हात्रेंचा मविआवर निशाना; अशी महाराष्ट्राची संस्कृती नाही
कल्याण डोंबिवली वादळी वाऱ्यासह मुरळधार पाऊस