सुषमा अंधारे यांचं कायद्यावर बोट; म्हणाल्या, शिवसेना आणि धनुष्यबाण आमचंच

| Updated on: Jan 21, 2023 | 9:04 AM

कायदे, नियम सांगत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून शिंदे गटासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका

धनुष्य बाण कोणाला मिळणार याचा निर्णय 30 जानेवारी रोजी निर्णय होणार असून निवडणूक आयोगाने सोमवारी ठाकरे आणि शिंदे गटाला लेखी उत्तर दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे असताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी असे म्हटले की, मतदानाची टक्केवारी बघता शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे ठाकरे गटाचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकलाआधी निवडणूक आयोगाने निकाल देणे चुकीचं होईल, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी कायदे, नियम आणि प्रक्रिया समजावून सांगत शिंदे गटासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

कोणत्याही पक्षाचा पक्ष नेता, जर त्याचा पक्ष सत्तेत आला तर तो सत्तेत मुख्यमंत्रीपदावर बसतो. मुख्यमंत्री, पंतप्रधान पदावर बसण्यासाठी त्या पक्षाचा नेता निवडावा लागतो. 2019 सालीच उद्धव ठाकरे यांची नेता निवड झाली होती. 2019 साली झालेल्या नेता निवड प्रक्रियेत शिंदे गटातील लोकचं होते. जे लोक आता आक्षेप घेत आहेत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. पुढे त्या असेही म्हणाल्या, जर शिंदे गटातील लोकं म्हणताय की, ही प्रक्रिया बेकायदेशीर आहे. तर तुमचं निवडणून येणं देखील बेकायदेशी ठरेल. जे जे निवडून गेलेले लोकं आहेत, शिंदे गटाकडे असणाऱ्या आमदार खासदारांना एबी फॉर्म हा शिवसनेनेच दिला होता, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

Published on: Jan 21, 2023 09:04 AM
बारामतीच्या वाघासमोर कुणी सांगितला तासगावच्या क्रांतिकारकांचा इतिहास, हा व्हिडिओ पहायलाच हवा
मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजप आमनेसामने, अरेला कारे करत फुंकले रणशिंग