Special Report | संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढणार? ३ रूपयांचाच दावा का? अंधारे म्हणाल्या…

| Updated on: Apr 03, 2023 | 11:14 PM

VIDEO | सुषमा अंधारे यांच्याविषयी केलेलं ते वक्तव्य संजय शिरसाट यांना भोवणार? बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात सुषमा अंधारे ३ रूपयांचा दावा ठोकणार आहेत. शिरसाट यांनी केलेल्या एका वक्तव्याविरोधात सुषमा अंधारे शिरसाट यांना कोर्टात खेचणार आहेत. संजय शिरसाट यांनी मानहानीकारक वक्तव्य केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून प्रयत्न केले. मात्र कुठेही त्यांच्याविरोधात कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी आता कोर्टात धाव घेतली आहे. अंधारे यांनी आज पुणे कोर्टात शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. संजय शिरसाट यांच्याविरोधात त्यांनी मानहानीची नोटीस पाठवली आहे. कोर्टात जाण्यापूर्वी सुषमा अंधारे यांनी असे सांगितले ‘मी 156-3 नुसार कोर्टातून दावा दाखल करणार आहे. क्रिमिनल आणि सिव्हिल या दोन्ही प्रकारे खटले दाखल करत आहे. या केसमध्ये मी 3 रुपयांची अब्रुनुकसानीची मागणी केली आहे’. तर ३ रूपयांच्या दाव्यावर सुषमा अंधारे यांनी काय दिलं स्पष्टीकरण…

Published on: Apr 03, 2023 11:13 PM
ठाकरे गटातील नेता आक्रमक, देवेंद्र फडणवीसांच्या घरापर्यंत काढणार पदयात्रा; कारण काय?
‘अशा फाऊद, दाऊद राऊतने मोदींवर बोलू नये’, देवेंद्र फडणीस यांचा हल्लाबोल