रवींद्र धंगेकर यांचा विजय म्हणजे…, काय म्हणाल्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे बघा
VIDEO | रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर बघा काय दिली ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया
मुंबई : कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे. रवींद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत केलं आहे. धनशक्तीने जनशक्तीवर केलेली ही मात आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने जनमताचा कौल वाढत चालला आहे. हे पाच विधानपरिषद निवडणुकीनंतर पुन्हा कसबा पोट निवडणुकीच्या निकालाने सिद्ध केले आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून रविंद्र धंगेकर यांच्या विजयाने मविआला मॉरल बूस्ट मिळाला असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. पुढे सुषमा अंधारे असेही म्हणाल्या की, जोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं नाव भाजपसोबत होतं, तोपर्यंत त्यांना कसब्यात विजयाचा विश्वास होता. मात्र ज्याक्षणी त्यांनी शिवसेनेसोबत बेईमानी केली त्याक्षणी ओरिजनल शिवसेना मविआच्या बाजूने उभी राहिली आणि आज त्यांची परिणीती म्हणजे रविंद्र धंगेकर यांचा विजय झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.